अवयव प्रत्यारोपण हा अवयवाला झालेल्या आजाराच्या शेवटच्या टप्यात असलेल्या रुग्णांसाठी एक शेवटचा आशेचा किरण आहे. मग ते हृदय, फुफ्फुसे, मूत्रपिंड किंवा यकृत असो, प्रतिक्षायादीमधील अवयव प्राप्तकर्ता व त्याचा परिवार त्यांना योग्य दाता मिळाल्याची माहिती सांगणारा टेलिफोन येण्याची उत्कंठेने वाट पाहत असतात. हा काळ अत्यंत तणावग्रस्त असू शकतो. अवयव दानाची वाट पाहण्यासोबतच तणावामुळे रुग्णांना इतर सह- विकृतींचादेखील त्रास होऊ लागतो. अशा केसेससंदर्भात दीर्घकाळ दिसून येणारे दोन सामान्य घटक म्हणजे तणाव व चिंता. मृत्यू होण्याची भिती, आर्थिक अस्थिरता, कौटुंबिक सदस्यांबाबत विचार, सतत होणारा हॉस्पिटलचा खर्च, दीर्घकाळ चालणारा उपचार इत्यादी तणावामागील कारणे असू शकतात. अवयव मिळण्याकरिता लागणाऱ्या अधिक वेळेमुळे प्राप्तकर्ते मानसिकरित्या असहाय्य व निराश होतात आणि त्यांच्या प्रियजनांवर आपण ओझे बनल्यारची भावना त्यांच्यामध्ये निर्माण होते. प्रतिक्षायादीत असलेल्या रुग्णांना दात्याचे अवयव केव्हा उपलब्ध होईल, याबाबत काहीच कल्पना नसते आणि प्रसंगी, त्यांना आठवडे किंवा वर्षे वाट पाहावी लागते. तणावासोबत येते नैराश्य. योग्य वेळेत अवयव
मिळेल की नाही, हा प्रश्न त्यांच्या मनात वारंवार येत राहतो आणि ते सतत त्यांच्या डॉक्टरांकडे चौकशी करत राहतात. यादीमधील रुग्ण डॉक्टाराकडून मिळणाऱ्या सुटकेची वाट पाहत असतात. इतरही काही घटक आहेत, जे या रुग्णांच्या नैराश्य स्थितीमध्ये भर करू शकतात. दीर्घकाळापर्यंत वाट पाहत असलेल्या, रुग्णांचे (गंभीर स्थितीत नसलेले) आरोग्य खालावत जात असल्याचे दिसून येते. आणखी एक पैलू आहे. त्याला/तिला दुसऱ्या व्यक्तीच्या मृत्यूमुळे होणाऱ्या लाभांविषयी त्याच्या/तिच्या मनात येणारा विचार, ज्यामधून दोषी असल्याची भावना निर्माण होते आणि नैराश्य वाढण्याचा धोका वाढतो. प्रत्यारोपणानंतरचे विचार काहीवेळा नैराश्याची स्थिती निर्माण करतो. प्रत्यायरोपण केल्यानंतर दात्याचे अवयव व्यर्थ ठरले तर किंवा आरोग्यिविषयक आजार व दीर्घकाळापर्यंत चालणारा उपचाराचा धोका वाढला तर, असे विचार मनात येऊ लागतात. प्रतिक्षाकाळ रुग्णावर दबाव आणू शकतो आणि ठराविक कालांतराने भिती व चिंताग्रस्त भावनेची निर्मिती करू शकतो.
आज, भारतात १ लक्षहून अधिक प्राप्तपकर्ते अवयवांची वाट पाहत आहेत आणि फक्त १५,००० दात्यांनी त्यांचे अवयव दान करण्याच्या दिशेने घेतला आहे. उपलब्धतेपेक्षा मागणी पुढाकार अधिक आहे. अवयवदानासंदर्भात, भारत आजही मागेच आहे आणि थोर कार्याविषयी जागरुकतासुद्धा कमी आहे. प्रत्यारोपणाची वाट पाहणाऱ्या रुग्णांना या कठीण परिस्थितीचा सामना करण्यांमध्ये आणि त्यासोबत येणारे तणाव व चिंता दूर करण्यामध्ये मदत करण्यासाठी प्रत्यारोपणानंतरचे उपचारसुद्धा दिले पाहिजेत. अशा स्थितीमध्येर पाठबळ असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण अस्थिर मन आजारात अधिक भर टाकू शकते आणि रुग्णाला धोका निर्माण होऊ शकतो.
गंभीर स्वरुपाच्या आजारांसह जैविक व शारीरिक बदल होण्यासोबतच भावनिक व सामाजिक बदल सुद्धा घडून येतात. रुग्णाला नवीन सामाजिक व्याधीचा सामना करण्यासोबतच त्यानुसार जुळवून घ्यावे लागते. स्वातंत्र्य व सामाजिक भूमिका (कौटुंबिक व व्यावसायिक) अधिक प्रमाणात कमी होण्यासोबत स्वतःशी जुळवून घ्यावे लागते. प्रतिक्षाकाळादरम्यान रुग्णाला तज्ज्ञांची मदत, तसेच अधिक प्रमाणात कौटुंबिक व सामाजिक पाठिंब्याची गरज भासू शकते. यासंदर्भात मदत करण्याकरिता काही
नैराश्याशी संबंधित विकृती या प्रत्यारोपणापूर्वी व नंतर प्राप्तकर्त्यांमध्ये अवयव सामान्यतः दिसून येणाऱ्या विकृती आहेत. प्रतिक्षाकाळाबाबत अनिश्चितता, सर्जरीशी संबंधित धोका आणि प्रत्यारोपणानंतरची बिघाडाची शक्यता हे भावनिक नैराश्य आणण्याचे स्रोत असू शकतात. लवकरात लवकर या नैराश्याला दूर करणे आवश्यक आहे, कारण यामुळे रुग्णाच्या रिकव्हरीवर परिणाम होऊ शकतो…
डॉ. केदार तिलवे, मानसोपचारतज्ज्ञ
हॉस्पिटल्समध्ये मानसशास्त्रज्ञ व मानसोपचारतज्ज्ञांची टीम असते. या हॉस्पिटल्समध्ये प्राप्तकर्त्यांसाठी स्वयं-सहाय्यता समूहांची सुद्धा निर्मिती केली जाते ज्यामुळे आम्ही प्रत्यारोपणापूर्वी व नंतरच्या काळामध्ये संपूर्ण पाठबळ देता येते.
– डॉ. राकेश राय, सल्लागार, एचपीबी व प्रत्यारोपण सर्जरी