Lodaer Img

वाढत्या चरबीमुळे यकृताला धोका

वाढत्या चरबीमुळे यकृताला धोका

जागतिक यकृत विशेष दिन, दरवर्षी भारतात जवळपास लाख गंभीर यकृतग्रस्त रुग्ण

आतापर्यंत यकृत विकाराचा थेट संबंध अल्कोहोलशी जोडण्यात येत होता. मात्र, त्याचसोबत बदलत्या जीवनशैलीतून होणारा संसर्ग, साखर यासह शरीरातील वाढत्या चरबीमुळे यकृतावर दुष्परिणाम होत असल्याचे डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले. शरिरातील सर्वात महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या यकृताची काळजी घेणे दिवसेंदिवस आवश्यक असल्याचेही डॉ. सुपे यांनी सांगितले.

सध्या यकृत विकारामागे अल्कोहोलचे प्रमाण, चरबीमुळेही यकृतावर दुष्प्रभाव वाढत असल्याचे सांगण्यात आले. चाळीशीतील महिला येऊन यकृतासंबंधी तक्रार करते. तपासणीत तिला यकृत विकार झाल्याचे निदान करण्यात येते. ती महिला अल्कोहोल प्राशन करणारी नसते. मात्र, त्यामागील शरीरातील चरबीचे कारण असल्याचे डॉ. सुपे यांनी सांगितले. स्थूलपणा, शरीरातील साखरेचे प्रमाणे आदी कारणांमुळेही यकृत विकार ग्रस्त रुग्ण पालिका रुग्णालयांमध्ये येत असल्याचे डॉ. सुपे यांनी सांगितले.

गंभीर इशारा

दरवर्षी भारतात जवळपास २ लाख गंभीर यकृतग्रस्त रुग्ण असतात. त्यातील २५ हजार रुग्णांना यकृत प्रत्यारोपणाची अत्यंत गरज असते. तशी गरज पूर्ण होत नसल्याने रुग्ण दगावत असतात. तर यातील निव्वळ १५०० यकृत प्रत्यारोपण भारतात होतात. एवढी गंभीर नव्या यकृतांची गरज असल्याची डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले.

नव्या आशादायी उपचार पद्धती पूर्वी यकृत सर्जरी कठीण समजली जात होती. मात्र, आता नव्या पद्धतींमुळे सहज झाली आहे. नव्या पद्धतीने सर्जरीतील भीती निघून गेली आहे. यामुळे बऱ्याचशा रुग्णांचे प्राण वाचत आहेत. या नव्या पद्धतींमध्ये प्रत्यारोपण आणि रेडिओलॉजीने यकृत विकारावर उपचार होऊ शकतात. यकृत प्रत्यारोपणासाठी दुसऱ्या शरीरातील यकृताची आवश्यकता असून ती अवयवदानाने थोड्या प्रमाणात पूर्ण होत आहे. तर यकृताला संसर्ग झाला असल्यास रेडिओलॉजीने उपचार होऊ शकतात. यात यकृतामध्ये नळी घालून विविध प्रकारची केमोथेरेपी देण्यात येते. शिवाय रेडिओथेरपी देखील शक्यता आहे. त्यामुळे यकृताचे आयुष्य वाढत असल्याचे डॉ. सुपे यांनी सांगितले.

तर पचनसंस्थेतील अत्यंत महत्त्वाच्या यकृतामध्येही आपण खालेल्या औषधांसहित सर्व पदार्थांवर प्रक्रिया होत असतात. पोटात जाणाऱ्या पदार्थांतील विविध प्रकारचे विषाणू द्रव्ये, दूषित घटक यांचा संसर्ग यकृताला लगेच होऊ शकतो. कित्येकदा यकृत विकार असल्याची माहितीही नसते. यकृत विकारांना कारण ठरू शकणाऱ्या रोगांच्या प्रतिबंधात्मक लसी आधीच टोचून घेणे अत्यंत महत्त्वाचे झाले असल्याचे फोर्टीस हॉस्पिटलचे वरिष्ठ सल्लागार डॉ. राकेश राय यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *