Lodaer Img

 ब्रेनडेड अवस्थेतील अवयवदानाचं प्रमाण वाढतंय

 ब्रेनडेड अवस्थेतील अवयवदानाचं प्रमाण वाढतंय

सरकारचे महाअवयवदान, वैद्यकीय क्षेत्रातील पुरस्कर्ते सामाजिक • क्षेत्रातील सक्रिय कार्यकर्ते आणि अवयवदानाची गरज ओळखून ब्रेनडेड अवस्थेतील रुग्णांचे नातेवाईक, या सर्वांमुळे २०१७चे अवयवदान चळवळीतील चित्र बरेचसे सकारात्मक असल्याचे समोर येत आहे. २०१७ च्या आठ महिन्यापर्यंत ३३ कॅडेव्हर झाले असून ही चळवळ अधिक वेग घेईल, असेच चित्र आहे.

अवयवदानातून एकाच वेळी अनेकांचे जीव वाचत असतात. याचा प्रचार करणारे सरकारचे महाअवयवदान चळवळ आणि सामाजिक क्षेत्रातून समाजात निर्माण झालेली जागरुकता यामुळे अवयवदानाचे प्रमाण वाढत आहे. मुलुंड येथील फोर्टीस रुग्णालयातील हृदय प्रत्यारोपण प्रमुख डॉ. अन्वय मुळे यांच्या मते, देहदानाच्या प्रक्रियेत एक निश्चित प्रक्रिया आहे. मेंदूचे कार्य बंद पडल्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाला असे डॉक्टरांनी जाहीर करणे ही यातील सर्वांत महत्त्वाची.

पायरी आहे. मेंदूमृत्यूच्या केसेस ओळखण्यासाठी प्रशिक्षण दिले पाहिजे. म्हणजे आरोग्यपूर्ण इंद्रीये काढून जतन करता येतील आणि आवश्यक तेथे नेऊन त्यांच्या प्रतिक्षेतील रुग्णांमध्ये त्यांचे प्रत्यारोपण केले जाईल. भारतात दरवर्षी अडीच लाख रुग्ण इंद्रियांचे काम बंद पडल्याने होणाऱ्या आजारांमुळे दगावतात. मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी दोन लाखांहून अधिक रुग्ण नोंदणी करतात, पण त्यातील आठ हजार रुग्णांनाच मूत्रपिंड मिळते. ६० हजार रुग्णांना

हृदय प्रत्यारोपणाची गरज आहे, ८५ हजार रुग्ण यकृत प्रत्यारोपणाच्या प्रतिक्षेत आहेत. देहदान ही काळाची गरज असल्याकडे प्रत्यारोपण तज्ज्ञ आता लक्ष वेधत आहेत. काही गैरसमजांमुळे निर्णय घेण्यास कुटुंबियांचे समुपदेशन करून त्यांना देहदानाचे महत्त्व पटवून दिले जाते. एकंदर परिस्थिती गंभीर आहे. ही तफावत भरून काढण्याची जबाबदारी एक समाज म्हणून आपल्यावर असल्याचे डॉ. राकेश राय यांनी सांगितले.

अवयवदान हे महादान असून नवे जीवन देण्याचे काम करते. मेल्यानंतर अवयव जाळून किंवा गाडून कोणताच फायदा होत नाही. त्यापेक्षा अवयवदान करा. अवयवदानाबाबत जागरुकता

निर्माण होत असून फक्त मुंबईतून ३३ अवयवदान (ब्रेनडेड) झाले आहे. हे चित्र चांगले असून वर्षाअखेरीस अजून चित्र स्पष्ट होईल.

डॉ. एस. के. माथुर, उपाध्यक्ष, विभागीय प्रत्यारोपण समन्वय समिती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *