यकृत हा शरीरातील अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. हा अवयव अनेक प्रकारची कामे करतो. यात पोषक घटकांवर प्रक्रिया करणे, रक्ताचे शुद्धिकरण करणे आणि संसर्गाशी लढा देणे या कार्यांचा समावेश आहे. हेपटाटटिस (यकृताचा दाह होणे) होण्यासाठी विषाणू कारणीभूत असतात. यापैकी अनेक विषाणू आपल्या शरीरात खूप मोठ्या कालावधीसाठी वास्तव्य करतात आणि त्यामुळे यकृताला इजा पोहोचवतात. परिणामी लिव्हर सिव्हॉसिस किंवा यकृताचा कर्करोगही होऊ शकतो.
विषाणूमुळे होणाऱ्या हेपटायटिसपैकी हेपटायटिस ए आणि ई हे विकार बहुधा दूषित पाणी किंवा अन्नामुळे होतात, तर हेपटायटिस बी आणि सी हे विकार रक्त किंवा शारीरिक स्रावांच्या सक्रमणामंमुळे होतात.
हेपटायटिसच्या सुरुवातीला रुग्णाचे डोळे, लघवी पिवळसर होतात (कावीळ), अस्वस्थपणा वाटतो आणि पोटाला सौम्य प्रकारचा त्रास जाणवतो. काही वेळा ही लक्षणे खूप सौम्य असतात आणि काही प्रकरणांमध्ये त्या व्यक्तीला विषाणूमुळे हेपटायटिस झाला आहे, याची जाणीवही होत नाही. ही लक्षणे सौम्य वाटत असली तरी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक ठरते. रुग्णाला
विषाणूमुळे होणाऱ्या हेपटायटिसपैकी हेपटायटिस ए आणि ई हे विकार बहुधा दूषित पाणी किंवा अन्नामुळे होतात, तर हेपटायटिस बी आणि सी हे विकार रक्त किंवा शारीरिक स्रावांच्या संक्रमणांमुळे होतात.
विषाणूमुळे होणाऱ्या हेपटायटिसची लागण झाली आहे का आणि तो नक्की कुठल्या प्रकारचा हेपटायटिस आहे याचे निदान होणे अत्यंत महत्त्वाचे असते.
हेपटायटिस ए आणि ई हे बहुदा मर्यादित स्वरूपाचे असतात आणि काही आठवड्यांमध्ये बरे होतात. पण काही प्रकरणांमध्ये हेपटायटिसची वाढ झपाट्याने होऊन यकृत निकामी होते आणि त्यामुळे जीवाला धोका निर्माण होतो. यापैकी काही रुग्णांना यकृत प्रत्यारोपणाची आवश्यकता असते. याचे परिणाम खूप चांगले असतात. विशेषतः गर्भवती महिलांना हेपटायटिसच ई या रोगाचा संसर्ग होणे गंभीर असते.
हेपटायटिस बी आणि सी या रोगांच्या विषाणूंमुळे हेपटायटिस ए आणि ई यासारखे गंभीर आजार होऊ शकतात. यातील मुख्य फरक हा की, हेपटायटिस बी आणि सी हे विषाणू कोणतेही लक्षण न प्रदर्शित करता काही रुग्णांमध्ये दीर्घ काळ राहू शकतात आणि हळूहळू यकृताला इजा पोहोचवत राहतात. या गंभीर स्वरूपाच्या विषाणूमुळे होणाऱ्या हेपटायटिसमुळे सिहॉसिस आणि यकृताचा कर्करोगही होऊ शकतो.
पटायटिस ए आणि हेपटायटिस बी या रोगांना प्रतिबंध करता येऊ शकतो आणि त्यासाठी लस उपलब्ध आहे.