एखाद्या अवयवाला झालेल्या आजारावर उपचार करण्याचा शेवटचा टप्पा म्हणजे अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होय. परंतु, आपल्याकडे अवयवदानाचे प्रमाण फारच कमी असल्यामुळे अवयवदान प्रतिक्षायादीतील रुग्णांची संख्या खूपज जास्त आहे. ही प्रतिक्षा यादी कमी व्हावी आणि रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत, यासाठी अवयवदान करणे ही काळाची गरज बनली आहे, असे आवाहन फोर्टिस हॉस्पिटलचे डॉ. राकेश राय यांनी केले आहे. अवयव मिळण्यातकरिता लागणाऱ्या अधिक वेळेमुळे प्राप्तकर्ते मानसिकरित्या असहाय्य व निराश होतात आणि त्यांच्या प्रियजनांवर आपण ओझे बणल्याची भावना त्यांच्यामध्ये निर्माण होते. प्रतिक्षायादीत असलेल्या रुग्णांना दात्याचे अवयव केव्हा उपलब्ध होईल, याबाबत काहीच कल्पना नसते आणि प्रसंगी, त्यांना आठवडे किंवा वर्षे वाट पाहावी लागते. त्यामुळे अशा रुग्णांमध्ये तणावासोबत नैराश्य येते, असे ते म्हणाले. चिंता, भीती याबद्दलही त्यांनी सांगितले.
- 0 Comments
- Liver Surgeon in Dubai, Liver Transplant